बोलूया स्वतःविषयी!

“आरसा बघायचीच भीती वाटते मला आजकाल…कारण आरशात जी मुलगी मला दिसत असते तशी मी नाही..

मी जशी आहे तशी आरशात का दिसत नाही मग?

आरसा सुद्धा बदलून बघितला मी.. पण मी स्वतःला तशीच दिसतेय.

मला काय झालंय?

मैत्रीणीना, आईबाबांना मी कशी वेगळी दिसते मग?

त्या तर म्हणतात की मुळीच नाहीस तू जाड…

आई बाबा पण म्हणतात, नसती उपासमार करून आजारी पडशील.

मैत्रिणी हसतात मला..पण काही खायचं म्हटलं की मला आरश्यात दिसणारी मी आठवते..”

हे सगळे प्रश्न पडले होते १५ वर्षाच्या एका मुलीला जी तिच्या वयाच्या इतर मुलींसारखीच होती.

आणि आरसा बघायला नको असे म्हणता म्हणता तिचा सगळा वेळ स्वतःकडे बघण्यात आणि स्वतःचे आवरण्यातच जात होता.

विचार करतांना वाटलं की खरंच किती महत्वाचं असू शकतं ना आपण कसे दिसतो हे एखाद्या व्यक्तीसाठी?

आणि तसं बघायला गेलं तर आपल्यापैकी अनेकजण स्वतःच्या दिसण्याबद्दल खूप जागरूक आहेत असं दिसेल आपल्याला आपल्या आजूबाजूला.

आपण आपल्या स्वतःचा विचार कसा करतो?

आपल्या स्वतःबद्दल आपल्याला काय माहीत आहे?

माझे दिसणे, वागणे, माझ्या भावना याबद्दल मला काय वाटते? त्या आपण कशा व्यक्त करतो? मी म्हणजे माझे शरीर.

माझे दिसणे, माझे बोलणे, माझे वागणे आणि माझे संपूर्ण व्यक्तिमत्व.

माझ्या बाह्य शरीराबद्दल मला काय काय वाटते?

आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या शरीराचा विचार करत असतो.

दिवसातून एकदा तरी आरशात स्वतःचे संपूर्ण प्रतिबिंब बघत असतो.

आपल्या स्वतःबद्दल आणि शरीराबद्दल आपल्या मनात अनेक विचार असतात.

आपले शरीर जसे प्रत्यक्षात आहे, तसे दिसते का आपल्याला?

की आरशात ते वेगळे दिसते?

दुसऱ्यांना किंवा आपल्याला बघणाऱ्या इतर लोकांना ते कसे दिसतेय याबद्दल आपण सतत विचार करत असतो.

माझ्यात काय चांगले आहे हे बघण्यासाठी खरं तर आरसा असतो.

“पण प्रत्यक्षात तो बघितला जातो माझ्यात काय चांगलं नाहीये हे लपवण्यात किंवा दुरुस्त करण्यात. सुंदरातल्या सुंदर समजल्या जाणाऱ्या व्यक्ती देखील हेच बघतात.

याला अपवाद फक्त एक असतो..प्रेमात पडल्यावर! कारण फक्त त्याच वेळी आपल्या प्रतिबिंबावर सुद्धा आपण खुश असतो. सगळे जगच सुंदर दिसत असते.

असे होते कारण आपल्या डोळ्यावर प्रेमाचा चष्मा असतो. आणि त्याची काच सुंदर असते! इतक्या दिवस आपल्या दिसण्यातल्या आपल्याला नकोशा असलेल्या गोष्टी देखील या काचेतून मोहक दिसतात. आकर्षक आणि सुंदर दिसण्याबद्दलच्या सामाजिक दृष्टिकोनाचा प्रभाव आपल्यावर अगदी लहानपणापासून असतो.

त्या ठराविक साचेबद्ध,आदर्श पण काल्पनिक प्रतिमेमध्ये आपण स्वतःला बघत असतो आणि सतत फक्त तुलना करत असतो. त्या प्रतिमेच्यापेक्षा जास्त आपल्यात काही असेल तर आभाळ दोन बोट असते आपल्यासाठी.

त्या प्रतिमेच्या जवळपास पोहोचणारे लोक देखील त्या खालोखाल आभाळातच वास्तव्यास असतात. पण अगदी कुरूप आणि अगदी सुंदर या दोन टोकांच्या मध्ये असलेल्या लोकसंख्येमध्ये बहुसंख्य प्रजा असते! अगदी कुरूप ही देखील एक काल्पनिक प्रतिमाच आहे.

कारण खरंतर दिसायला रूढ अर्थाने चांगले नसणाऱ्या व्यक्तीत देखील काहीतरी आकर्षक नक्की असते. आणि सुंदरतेच्या साचेबद्ध कल् पनांच्या मध्ये असलेली बहुसंख्य प्रजा स्वतःबद्दल काय आणि कसा विचार करते हे फार फार महत्त्वाचे आहे.

आरशात आपण कसे दिसतो याची जाणीव आता अगदी लहान वयात मुलांना होते आहे.

या दिसण्यात सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे माणसाचा रंग!

अजूनही गोरा रंग, सौंदर्याचं प्रतीक समजला जातो. बहुतेकांच्या मनात हा बिलिफ खोलवर रुजलेला आहे.

या गोरेपणाच्या वेगवेगळ्या छटा असलेले लोकसुद्धा वेगवेगळ्या कारणाने आपल्या रंगाबाबतीत समाधानी नसतात.

गोऱ्या रंगाबाबत चे हे आकर्षण मग मेडिकल दुकानातल्या फेअरनेस क्रीम चा खप वाढवते.

उंचीबाबत पण असेच. कोणाला आपली अति उंची नकोशी वाटते..केवळ म्हणून उगीचच पाठीत वाकून चालतात लोक. तर कोणाला आपण फार बुटके आहोत इतरांपेक्षा असे वाटून मग अशी लोकं आपल्या वयाला आणि पावलांना न पेलवणारे उंच टाचांचे शूज घालून उंची वाढवण्याचा उगीच प्रयत्न करतांना दिसतात.

शरीराच्या आकाराबद्दल तर सगळ्याच वयांच्या लोकांचा प्रोब्लेम.

एखाद्या व्यक्तीची उंची,जाडी सगळे त्याच्या दृष्टीने व्यवस्थित असले तरीही त्या व्यक्तीला आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांबद्दल मनात अस्वस्थता असू शकते. कोणाला आपले नाक फारच मोठे आहे असे वाटते..तर कोणाला आपले ओठ भलतेच जाड आहेत असे वाटत असते..आपल्या पोटाच्या आकाराबद्दल अस्वस्थता असणारे आणि उगीचच श्वास रोखून पोट आत खेचून घेण्याची सवय असणारे हमखास बघायला मिळतील आपल्याला आपल्या आजूबाजूला..फोटो काढतांना तर नक्कीच!

एकूण काय बऱ्याच लोकांना आपल्या अवयवांचे लहान मोठे आकार अस्वस्थ करतात.

खरंतर प्रत्येकाने हे तपासावे की मी जसा आहे तसा किंवा तशी, मला स्वतःला मी आवडतो/ आवडते आहे का?

बॉडी शेप अमूक एक असा असायला हवा म्हणजे चांगला..ठरवले कोणी हे?

आपल्याच शरीराबद्दल किती हे अवास्तव चित्र आपल्या मनात?

माझ्या स्वतःबद्दल मीच असमाधानी,नाखूष. असे मनात वाटून आपलं मनस्वास्थ बिघडवून घेण्याची खरंच गरज आहे? स्वतःचा आपण जसे आहोत तसाच स्वीकार केला तर?

माझं शरीर जसं आहे तसंच माझं मला खूप आवडतं, असा विचार करा.

समजा असतील शरीराच्या आकाराबाबत माझ्यात काही उणीवा..मग काय?

प्रयत्नपूर्वक त्या दूर करेन मी. ते शक्य आहे मला.

पण माझी उंची, रंग, शरीराच्या इतर अवयवांचा आकार..या काही माझ्या उणीवा नाही होऊ शकत. मीच सतत माझ्या या बाजूकडे भिंगातून बघत राहिलो/ राहिले तर मला इतर काही न दिसता फक्त तेच दिसेल माझ्यात. पण मी म्हणजे काही माझी फक्त ‘उंची’ आहे? की नाकाचा,ओठांचा आकार म्हणजे आहे ‘मी’?

माझा रंग म्हणजे ‘मी’ आहे का? की माझी ‘जाडी’ आहे माझी संपूर्ण ओळख? नाही ना?

माझी खरी ताकद आहे मी माझ्या स्वतःचा मी जसा/जशी आहे तसा केलेला स्वीकार.

माझ्याकडे जे आहे त्याची समज आणि जाणीव ही आहे माझ्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख.

हे एकदा समजून घेतलेत ना, तर ती आहे आपल्या स्वतःकडे बघण्याची निरोगी दृष्टी.

स्वतःच्या शरीराची खरीखुरी निरोगी,निकोप ओळख.

तुमच्यातल्या या काही नैसर्गिक गोष्टींवरून जे तुम्हाला चिडवतात त्यांना स्वतःलाच त्यांच्या शरीराबद्दल काहीतरी न्यूनगंड असतो याची खात्री बाळगा.

तुम्हाला चिडवून ते स्वतःसाठी रोगट आत्मविश्वास मिळवत असतात.

म्हणून आज आधी स्वतःच्या शरीराला ओळखायला हवे..

त्याच्याशी मैत्री करायला हवी. आपल्या आजूबाजूला बघितलं की लक्षात येईल की प्रत्येकजण किती वेगळा आहे..आणि प्रत्येकाच्या व्यक्तीमत्वात असे काहीतरी आहे जे त्याला खरोखर सुंदर बनवते.

निसर्गाने एक अशी खास शक्ती प्रत्येकाला दिलेली आहे आणि प्रयत्न केला तर ती ओळखण्याची समज सुद्धा !

कुणालशी बोलल्यानंतर त्याला त्यातल्या त्यात एक गोष्ट पटकन समजली की अजून दोन वर्षात जर एक डिग्री मिळणार असेल तर चांगला अभ्यास करून ती मिळवता येणे शक्य आहे..म्हणजे बाबांच्या मनासारखे होऊन निदान त्यावरून बिघडणारे घरातले वातावरण नीट व्हायला तरी मदत होईल.

आणि बाबा अजून काही वर्ष व्यवसाय करू शकणार आहेत तर त्यांच्या व्यवसायात मदत करता करता त्याच्या आवडीचे शिक्षण घेणे सुद्धा कदाचित त्याला शक्य आहे. शेवटी शिकलेले काहीही वाया जात नाही आणि दोन वर्ष जर बाबांच्या मनासारखा अभ्यास केला तर त्यासाठी त्यांचे मन वळवणे, जिंकणे शक्य होऊ शकेल..

आणि हे करण्यासाठी कुणालची मनापासून तयारी होती. पाणी वाहते होण्यासाठी कुठेतरी तर सुरवात होणे गरजेचे होते.

पालकांनी मुलांच्या इच्छेप्रमाणे त्यांना शिकू द्यावे हे खरे आहे पण मुलांचा शिक्षणातील कल ओळखण्याची सुरवात शालेय वयापासून करायला हवी. पालक आणि मुलांच्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्न यामध्ये समन्वय असावा, एकमेकांमध्ये मनमोकळा संवाद करता येईल असे वातावरण असावे.

काही घरांमध्ये अशी अर्ध्या रस्त्यात येऊन थांबणारी, अडणारी आणि पुढे जाण्यासाठी चक्क नकार देणारी मुले बघायला मिळतात. आणि मग घर म्हणजे रोज दंगल, रोज लागणारा कर्फ्यू.

मुलांना शिकण्याबद्दल आवड निर्माण होणं, त्यांच्या आवडीचा विषय, त्यात कष्ट करण्याची त्यांची तयारी हा सगळा मुलं लहान वयात असतांनाच पालकांनी अत्यंत समजदारीने आणि जबाबदारीने लक्ष घालण्याचा विषय आहे.

आज शाळेत असल्यापासून प्रत्येक विषयात चांगले मार्क मिळवण्यासाठी आणि इतर मुलांच्या पुढेच जाण्यासाठी मुलांवर ज्या प्रकारची सक्ती केली जाते आणि त्यासाठी शिस्त लावली जाते त्यातून मुलांमध्ये शिकण्याविषयी संपूर्ण नावड निर्माण होते,असे चित्र बऱ्याच कुटुंबामधून बघायला मिळते आहे.

शालेय शिक्षणात मुलांच्या आवड, कल्पना,इच्छा,आणि सृजनशीलता आपोआप उमलतील आणि त्यांना शिकण्यात आनंद मिळेल असे चित्र आज किती कुटुंबांमध्ये बघायला मिळते?

अपवादाने एखादे घर असे मिळेल.

जगाच्या स्पर्धेत इतरांच्या तुलनेने आपल्या मुलाने कुठेही मागे पडू नये असे पालकांना वाटण्याच्या बाबतीत कुणालचे घर अपवाद नव्हतेच.

त्याला जे हवे आहे ते शिक्षण घेऊ देण्याची पालकांची तयारी नव्हती.

अर्थात पालकांच्या दृष्टीने हे सगळे त्याच्याच भल्यासाठी आणि भविष्यासाठी होते.

यशस्वी होण्याच्या, पैसे कमावण्याच्या आणि सुखी होण्याच्या पालकांच्या कल्पना आणि जगाचे त्यांना आलेले आजपर्यंतचे अनुभव यातून त्यांना वाटणारी असुरक्षितता म्हणून त्यांचेच म्हणणे त्यांना आपल्या परीने योग्य आणि काळानुरूप वाटत होते.

आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे, काय वाटते हे कुणालला आई बाबांना नेमक्या शब्दात सांगता येत नव्हते आणि आपल्या मनातली त्याच्याबद्दल वाटणारी काळजी आणि प्रेम ना आईवडिलांनाही कुणालला समजेल अश्या भाषेत त्याला सांगता येत नव्हती.

वडिलांच्या इच्छेसाठी आपल्याला आवडत नसतांनाही फार्मसी कॉलेजला प्रवेश घेणारा कुणाल आणि त्याच्या भविष्यासाठी काळजी करणारे त्याचे वडील… यात दोन्ही बाजूंनी काळजी,प्रेम आणि एकमेकांविषयी वाटणारे प्रेम नाही का? आहेच.

पण एकमेकांची प्रेम व्यक्त करण्याची भाषा एकमेकांना समजत नाहीये आणि म्हणून एकमेकांवर प्रेम करणारी ही माणसं एकमेकांना सगळ्यात जास्त दुखावत आहेत.

कुणालला जो राग आला त्याबद्दल आणि त्याने रागात केलेल्या कृतीबद्दल त्याला स्वतःला पश्चताप होतो आहे.

आणि त्याच्या रागाच्या कृतीवर त्याच्याच भाषेत उत्तर देणारे त्याचे वडील..त्यातून निर्माण झालेला शारीरिक दुखापतीचा प्रसंग आणि सगळ्यांच्याच मनात निर्माण झालेली असुरक्षितता, भीती..

या सगळ्यात प्रेम आणि चांगल्या भविष्याचे स्वप्न कुठल्याकुठे हरवून गेले.

आणि आता तर त्यांना एकमेकांच्या समोर येण्यासाठी पण अवघड वाटते आहे!

कुणाल,आई,केतकी आणि आजी-आजोबा सगळ्यांनी हळूहळू आपले रुटीन सुरु केलं.

एकट्या कुणालचे घरात मिळून मिसळून वागणे देखील पाणी वाहते होण्यासाठी पुरेसे होते.

तो मनापासून अभ्यास करतोय हे बघून काही दिवसात वातावरण आणखी निवळले आणि ऐके दिवशी बाबांनी कुणालला जवळ घेऊन त्याची माफी मागितली…सगळ्यांचे डोळे पाणावले..

आणि लवकरच घरातले सगळे मिळून नवीन टीव्ही घेण्यासाठी म्हणून बाहेर पडले.

त्यांच्या घरात निर्माण झालेला ताण निवळला ही चांगली गोष्ट आहे पण म्हणून काही गोष्ट सुफळ संपूर्ण झाली असे नाही.

आयुष्यात यशस्वी होणं… जोपर्यंत पैसा,विविध सुख-साधनं आणि न संपणाऱ्या गरजा,चैन आणि समृद्धी यांच्याशी जोडलं गेलेलं आहे तोपर्यंत ही कहाणी प्रत्येक कुटुंबातून घडत राहील. यश-अपयश, स्पर्धेत पुढे जाणं- मागे राहणं, श्रीमंती आणि समृद्धी केवळ या साठीच जगायचं असतं का आयुष्य?

‘श्रीमंत’चा अर्थ…’सुखी’चा अर्थ खरंच का इतका मर्यादित आहे?

त्यासाठी कुटुंबातला संवाद हरवावा आणि मनस्वास्थ्यांची एकमेकांत टक्कर व्हावी?

मायेच्या धाग्यांनी बांधलेल्या नात्यांमधून देखील‘आपलेपण’जपणं खरंच इतकं कठीण आहे?

नाही…कठीण नाही…फक्त नात्यांमधील समजूत कमी पडते आहे.

आपले म्हणणे समोर असलेल्या आपल्या व्यक्तीने ऐकावे असे वाटून आपण थांबून घेतो आहोत आणि समजतो आहोत की माझे म्हणणे त्याला कधीच समजत नाही.

पण त्याचे देखील काही म्हणणे आहे आणि ते मात्र समजून घेण्याची आपली तयारी नाही.

ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की मूळ हेतू कुठेतरी अगदी प्रामाणिक आहे…मुलांना आपला रस्ता स्वतः चालायचा आहे,शोधायचा आहे आणि

आई-वडिलांना वाटते आहे आम्हाला त्रास झाला तरी चालेल पण मुलांसाठी अर्धा रस्ता तयार करून ठेवतो म्हणजे आपल्या नंतर आपल्या मुलांना इतर सगळ्यांबरोबर सुख,समाधानाने राहता यावे..आयुष्य जगता यावे!

पण ‘पिकते तिथे विकत नाही’ हा मुलभूत विचार करून बघायला हरकत नाही….!

Call
Whatsapp
Appointment